आदर्श पुरस्कार प्राप्त लाचखोर तलाठी अमोल रामशेट्टी वर गुन्हा दाखल 👉15 आर जमिनीच्या फेरफारासाठी मागितले 40 हजार ,लाच मागितल्याचा गुन्हा नोंद. उदगीर= उदगीर तालुक्यातील निडेबन महसूल विभागाचे तत्कालीन तलाठी तथा नळेगाव येथे कार्यरत अमोल रामशेट्टी वर नळेगाव येथील शेतकऱ्यास 40 हजाराची लाच मागितली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून या तलाठ्याने निडेबन येथील कार्यकाळात करोडो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याची चर्चा असून यांनी अनेक कारणामेही केल्याचे लोक बोलत आहेत आरोपी तलाठी अमोल रामशेट्टे, पद- ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), नेमणूक तलाठी कार्यालय, नळेगाव ता. चाकुर जि. लातूर गट - क विरुद्ध लाच लुचपत विभाग लातूर येथे दि. 10/10/2025 रोजी तक्रारदार यांनी तक्रार दिली कि, तक्रारदार व त्यांचा भाऊ नफिस यांनी मौजे नळेगाव येथील गट नंबर 827/01 मधील खरेदी केलेली व कोर्ट डिक्री केलेली प्रत्येकी 0 हेक्टर 10 आर जमिनीची फेरफार नोंद करण्या करिता लोकसेवक अमोल रामशेट्टे यांनी तकारदार यांच्याकडे 35,000/- रू. लाचेची मागणी करत आहेत. पडताळणी केली असता दिनांक 14.10.2025 रोजी 14.24 वाजता तलाठी कार्यालय, नळेगाव ता. चाकुर येथे लोकसेवक अमोल रामशेट्टे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबीत कामासाठी पंचासमक्ष 40,000/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 39,000/- रू स्वीकारण्यास सहमती दर्शविल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले व सदर लाच रक्कम तलाठी कार्यालयात काम करणारा खाजगी व्यक्ती सदा यांच्याकडे देण्यास सांगितले, लोकसेवक अमोल रामशेट्टे यांनी तक्रारदार यांचे प्रलंबीत कामासाठी 39,000/-रू. लाचेची मागणी करून सदर लाच रक्कम ही खाजगी व्यक्ती सदा यांचेकडे देण्यास सांगितली होती त्यावरून दि. 14/10/2025, दि.15/10/2025 व दि. 28/10/2025 रोजी लाच स्विकृती सापळा आजमावला असता लोकसेवकास तक्रारदाराचा संशय आल्याने अमोल रामशेट्टे व खाजगी व्यक्ती सदा यांनी लाच रक्कम स्विकारली नाही. त्यांच्या विरुद्ध पो.स्टे.चाकुर, जिल्हाः लातूर गुन्हा रजि. नं.575/2025 कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988.प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अधिकारी करत असून,संबंधित तलाठ्याची मालमत्तेची चौकशी एस आय टी मार्फत करावी जेणे करून याने किती भ्रष्ट मालमत्ता जमवली हे उघड होईल अशी ही चर्चा तसील परिसरात लोक करत असल्याचे दिसून येत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
