दादा वर्षातून दोनदा तरी उदगीर ला या= जनतेची मागणी 👉 काय ती झाड,काय ती सफाई ,मुख्याधिकारी साहेब कधीतरी गल्लीत ही फेर फटका मारून गल्ली ची अवस्था बघा, उखडलेले रस्ते बघा ,या रस्त्यावरून जनता कशी वावरत असेल तेही बघा उदगीर= डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या उद्घाटनानिमित राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री अजित पवार 30 ऑक्टोबर रोजी उदगीर येथे येत असल्याने रातोरात शहरातील मुख्य रस्त्या वरील दुभाजकावरील मोठे मोठे झाडे तोडून तेथे शोभिवंत झाडे लावले गेले ,झाडे लाऊन झाल्यावर त्या झाडाना पाणी कधी कुणी घातले हे त्यांनाच माहीत पण यांची लाज वरून राजानी राखली,दादा येणार म्हणून मुख्य सडकेवरील दुभाजकास रंग रंगोटी तर झालीच पाहिजे, सफाई एकदम झकास होणारच यात कुठलीही शंका नसून असे जर दादा वर्षातून दोन वेळेस उदगीरात आले तर उदगीर शांघाई होईल असे जनतेस वाटत असून ,दादा तुम्ही वर्षातून दोनदा तरी उदगीर ला यावे अशी चर्चा जनता चौका चौकात करत आहेत,सोबतच दादांनी मुख्य रस्ता सोडून गल्ली बोळात ही येऊन कार्यकर्त्यांना भेटले तर गल्ली बोळात ही वैभव दिसेल असे ही मत जनता मांडत आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी