युती ला प्रचंड बहुमताने विजयी करा= माजी मंत्री आ.संजय बनसोडे 👉 युतीच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ संपन्न 👉जनतेचा विश्वास युतीच्या सर्व उमेदवारावर उदगीर : मागील सहा वर्षात उदगीर शहराचा कायापालट करून उदगीरला स्मार्ट सिटी करण्यासाठी मी दिवस रात्र मेहनत केली आहे. या पुढील काळात उदगीर शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शहरातील नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी व रिपाई या युती पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांनाच प्रचंड मताने विजयी करा असे आव्हान माजी क्रीडामंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केले आहे. सर्व महापुरुषांच्या विचाराने प्रेरित होऊन युती पक्ष आपली वाटचाल करत आहे त्यामुळे जनतेचा आमच्यावर विश्वास असून हे त्या निवडणुकीत आमचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा विश्वास हे आमदार संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे ते उदगीर शहरातील भुईकोट किल्ला येथे उदगीरचे आराध्य दैवत श्री उदयगिरी बाबांच्या चरणी नतमस्तक होवून महाआरती केली व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी, रिपाई या युती पक्षाच्या उदगीर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्वाती सचिन हुडे यांच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते. यावेळी माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल केंद्रे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, माजी नगरसेवक सचिन हुडे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.स्वाती हुडे, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे,शिवानंद हैबतपुरे , उत्तरा कलबुर्गे, दिपाली औटे, बालाजी भोसले, वसंत पाटील, श्याम डावळे, सय्यद जानिमियाँ, शशिकांत बनसोडे, अमोल अनकल्ले, रामदास बेंबडे, विजय निटुरे, मनोज पुदाले, अनिता हेबतपुरे, वैशाली कांबळे, आदीसह सर्व नवनिर्वाचित उमेदवार व युती पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खाजा बादशाहा दर्गा येथे चादर चढविण्यात आली. श्री गुरु हावगीस्वाती मठ संस्थान येथे व श्री शंकरलिंग महाराज मठ येथे दर्शन घेवुन विश्वशांती बुध्द विहार येथे अभिवादन करण्यात आले. तसेच साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करुन डॉ. झाकीर हुसेन येथे अभिवादन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन करुन राष्ट्रपिता म.गांधी यांना अभिवादन, म.बसवेश्वर महाराजांना अभिवादन, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले
• श्रीनिवास मदनलाल सोनी
