रामकथाचार्य शशिशेखर महाराज यांच्या रामकथेस उसळला जनसागर उदगीर= येथील सिग्नल नंबर 2,हनुमान नगर येथील हनुमान मंदिर परिसरात आयोजित शशिशेखर महाराज यांच्या रामकथेची 29 नोव्हेंबर शनिवारी रोजी भव्य सुरुवात झाली असून सदरील रामकथेचे 7 डिसेंबर रविवार रोजी समापन होणार असून ही कथा दररोज दुपारी 2 ते 5 वाजे पर्यंत सुरू आहे,या रामकथेस भक्ताचा जनसागर उसळला असून सर्व परिसर राममय झाल्याचे दिसून येत आहे,सदरील परिसरातील रहिवाश्यांनी या कथे चे आयोजन केले असून याचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ही आयोजकांनी केले आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी

