दत्त मंदिर परिसरातील भव्य सभागृहाची लवकरच उभारणी करणार =मा.मंत्री संजय बनसोडे 👉संताच्या वाणीतून समाजाला ऊर्जा मिळते : *उदगीर* : उदगीर मतदारसंघ हा एक ऐतिहासिक असून या मतदारसंघात अनेक धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या संख्येने होत आहेत. राज्यातून विविध भागातून संत या ठिकाणी येऊन त्यांचे अनमोल विचार समाजातील नागरिकांपुढे व्यक्त करत असतात. या सर्व संतांच्या वाणीतून समाजाला नवी ऊर्जा मिळत असुन आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होत असल्याचे मत राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा उदगीरचे आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते उदगीर शहरातील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त आयोजीत एकदिवसीय प्रवचन सोहळ्या प्रसंगी भाविकांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी गुंडानाथ महाराज, चक्रीनाथ महाराज, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, माजी नसरसेवक सुधीर भोसले, सोसायटीचे अध्यक्ष विजयकुमार पारसेवार, भागवत पारसेवार, सुरेश महाजन, बालाजी पोलावार, संजय कलकोटे, साईप्रसाद पारसेवार, सुयोग कोटलवार, विनोद कपाळे, शिवकुमार कांबळे, धिरज कसबे, गणेश गायकवाड, शहाजी पाटील, सावन पस्तापुरे, प्रीती कवतीकवार, डी.एस. बिरादार, सतिश पाटील माणकीकर, आदीनाथ चिकटवार, मल्लिकार्जुन लंजवाडकर, केशव पाटील, सावित्री पारसेवार, गोदावरी महाजन, मनीषा मुक्कवार, स्मिता मुक्कावार, ओम पिंगळे, आदी उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार संजय बनसोडे यांनी, आपल्या आमदारकीच्या व मंत्रिपदाच्या कार्यकाळात शक्य होईल तेवढ्या सर्व धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण आपण केले आहे. विविध ठिकाणी सभा मंडप उभारण्यात आले आहेत. भविष्यात उदयगिरी बाबा किल्ला परिसरात विद्युत रोषणाई करण्याचा आपला मानस असुन मागील काळात श्री गुरु हावगीस्वामी महाराज मठाला निधी दिला. श्री सिध्दरामेश्वर मठासह श्री रेणुकाचार्य संस्कार भवन उभारले, श्री गुरु हावगीस्वामी लिंगायत भवन उभारले असुन चौकीला मठालाही निधी दिला असल्याचे सांगितले. या येत्या वर्षाभरात या सोसायटीतील श्री दत्त मंदिर परिसरात सभामंडप उभारणार असल्याचे सांगून सर्वांना आ.बनसोडे यांनी श्री दत्त जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री दत्त जयंतीनिमित्त आ.संजय बनसोडे यांच्या हस्ते आरती करुन भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक - भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
• श्रीनिवास मदनलाल सोनी
