उदगीर नगरपालिकेच्या स्विकृत सदस्य पदी डॉ रामप्रसाद नरसिंगदास लखोटिया यांना संधी द्यावी= उदगीर तालुका माहेश्वरी सभा उदगीर= उदगीर तालुक्याची श्याम,प्रसिद्ध समाज सेवक,उदायगिरी नेत्र रुग्णालयाचे प्रमुख डॉ रामप्रसाद नरसिंगदास लखोटिया यांना उदगीर नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावी अशी विनंती समाजातर्फे आ.संजय बनसोडे यांना करण्यात आली असून ते या बाबत लवकरच योग्य निर्णय घेतील यात शंका नसल्याचे उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांनी व्यक्त केले आहे उदगीर तालुक्यातच नाही तर संपूर्ण मराठवाड्यात निस्वार्थ सेवा करणारे डॉ रामप्रसाद नरसिंगदास लखोटिया हे आहेत,त्यांना उदगीर च्या विकासाची जाण असून ते अनेक सामाजिक संघटने मध्ये काम करत असताना शहराचा विकास करण्यासाठी प्रयत्न करतात,एक आयामी व्यक्तिमत्व म्हणून उदगीर ची जनता त्यांच्याकडे पाहत असून त्यांना नगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून घेतल्यास ते एक निपुण सदस्य ठरतील यात शंका नसून त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घ्यावी अशी मागणी उदगीर तालुका माहेश्वरी सभे चे अध्यक्ष श्रीनिवास सोनी यांच्यासह सर्व समाज प्रेमी नी केली आहे
• श्रीनिवास मदनलाल सोनी
