नेत्याच्या मर्जी साठी अनेक समाजाचा सत्ताधाऱ्यांनी केला कढीपत्ता! 👉 ज्या मुस्लिम समाजानी एक हाथी सत्ता देण्यासाठी जीवाचे रान केले त्यांना न उपाध्यक्ष पद मिळाले न स्वीकृत सदस्य 👉 भाजपचा एकनिष्ठ, वोट बँक म्हणून ओळखणारा मारवाडी, आर्य वैश्य (कोमटी),ब्राम्हण समाजास मिळाले गाजर ? 👉 ज्यांना गल्लीत कोणी ओळखत नाही,शेजारी कधी भेटलेच नाहीत त्यांना स्वीकृत सदस्य करून कोणास खुश करण्याचं प्रयत्न उदगीर:- उदगीर नगर पालिका निवडणुकीत जे भाजपचे वोट बँक म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांना न भाजपाने न राष्ट्रवादी ने उमेदवारी दिली नाही स्वीकृत सदस्य केले,यांचे फक्त मतदान घेण्यापुरते पुतना मावशीचे प्रेम असल्याचे परत एकदा सिद्ध झाले असून त्यांना या समाजाशी काही देणे घेणे नसल्याचे सिद्ध झाले असून ज्या मुस्लिम समाजाने नगरपालिकेत एक हाथी सत्ता देण्यासाठी जीवाचे रान केले त्यांना उपाध्यक्ष पद मिळेल ही अपेक्षा असताना उपाध्यक्ष पद तर सोडाच पण त्यांनाही साधे स्वीकृत सदस्य पद ही न मिळाल्याने अनेक समाज नाराज असून ज्या व्यक्ती चा कुठलाच समाजसेवा,राजकारणाशी संबंध नसताना त्यास स्वीकृत सदस्य केल्याने शहरात चर्चा सुरू असून स्वीकृत सदस्य पद ही धन दांडग्या साठी असल्याची भावनाही अनेक जण व्यक्त करत आहेत
• श्रीनिवास मदनलाल सोनी